अधिकारी, कर्मचाºयांच्या स्पर्धांनी भरली रंगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:39 IST2017-11-19T00:38:52+5:302017-11-19T00:39:02+5:30
जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार हाकणाºया महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या विविध स्पर्धा परभणीत रंगत असून, कामाचा ताण बाजूला ठेवून अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

अधिकारी, कर्मचाºयांच्या स्पर्धांनी भरली रंगत
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याचा प्रशासकीय कारभार हाकणाºया महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या विविध स्पर्धा परभणीत रंगत असून, कामाचा ताण बाजूला ठेवून अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी झाले आहेत.
परभणीे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना शनिवारी प्रारंभ झाला. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मैदानावर शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, महसूल संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या.
त्यात येथील तहसीलदार विद्याचरण कडावकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर पुरवठा विभागाचे तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय विरुद्ध तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यात व्हॉलीबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, बॅडमिंटन स्पर्धा शनिवारी पार पडल्या.