शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

परभणी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासनाकडून माहितीचे संकलन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 11:25 AM

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली.

ठळक मुद्देया कुटूंबियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची यादी तयार करून अधिकारी, कर्मचा-यांना गावनिहाय भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले़ यासाठी प्रशासनातील ४५० अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली नैराश्याने ग्रासलेल्या कुटुंबियांचे मनोबल उंचावणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला़

परभणी : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची प्रशासनातील अधिका-यांनी भेट घेऊन या कुटूंबियांची संपूर्ण माहिती बुधवारी एकत्रित केली़ शेतकरी कुटूंबियांचा उदरनिर्वाह कसा होतो, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला का? याची माहिती अधिका-यांनी घेतली़ विशेष म्हणजे या कुटूंबियांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत़ 

मागील दोन वर्षांच्या काळात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले़ त्यामुळे शेतक-यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या़ अनेक शेतक-यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या़ या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना शासनाच्या वतीने एक लाख रुपयांची तातडीची मदत यापूर्वीच देण्यात आली आहे़ मात्र सध्या या कुटूंबियांचा उदरनिर्वाह कसा चालाते, त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळतो की नाही? याची खातरजमा करण्यासाठी राज्यस्तरावरून प्रशासनाला आदेश देण्यात आले आणि या आदेशानुसार परभणी जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना भेट देण्यासाठी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी ग्रामीण भागात पोहचले़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची यादी तयार करून अधिकारी, कर्मचा-यांना गावनिहाय भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले़ त्यानुसार प्रत्येक तालुक्यामध्ये महसूलचे कर्मचारी शेतकरी कुटूंबियांच्या घरी पोहचले़ 

या कुटूंबियांची आस्थेवाईक चौकशी करीत प्राप्त झालेल्या विवरणपत्रात माहिती जमा करण्यात आली़ शासनाच्या आदेशानुसार या कुटूंबियांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला का? त्यांचे जीवनमान सध्या कसे आहे? या पुढे कुटूंबियांना कोणता लाभ देता येऊ शकतो का? याचे वर्गीकरण केले जाणार असून, त्यानुसार कुटूंबियांना आधार देण्याचे काम केले जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी दिली. दरम्यान, आर्थिक विवंचनेमध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटूंबियांना  प्रशासनाच्या या उपक्रमामुळे आधार मिळणार आहे़  

साडेचारशे कर्मचा-यांची केली नियुक्ती

१ जानेवारी २०१२ ते ३० आॅक्टोबर २०१७ या काळात आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबियांची यादी प्रशासनाने तयार केली आहे़ या प्रत्येक कुटूंबियांच्या घरी जाऊन त्यांची माहिती १५ नोव्हेंबर रोजी एकत्रित करण्यात आली़ यासाठी प्रशासनातील ४५० अधिकारी आणि कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली होती़ प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना शेतकरी कुटूंबियांची यादी देऊन बुधवारी दिवसभरात या कुटूंबियांना भेट देण्याचे नियोजन आखण्यात आले़ त्यानुसार अधिकाºयांनी बुधवारी ही माहिती संकलित केली आहे़  

मनोबल उंचावण्यासाठी उपक्रमशेतकरी कुटूंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास कुटूंबाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होते़ कुटूंब उघड्यावर येते़ अशा कुटूंबांना शासन योजनांचा लाभ देत असले तरी सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून या कुटूंबियांची परिस्थिती काय आहे? ही कुटूंबे स्वबळावर उभी राहिलीत का? याची पाहणी करणे आणि नैराश्याने ग्रासलेल्या कुटुंबियांचे मनोबल उंचावणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला़ विशेष म्हणजे मराठवाड्यात सर्वत्र हा उपक्रम राबविला जाणार आहे़. यानंतर प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची माहिती एकत्रित करून या कुटूंबियांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभही दिला जाणार आहे़  

असा आहे उपक्रमविभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार परभणी जिल्ह्यात १५ नोव्हेंबर रोजी  आत्महत्याग्रस्त कुटूंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची माहिती एकत्रित करण्यात आली़ १८ नोव्हेंबर रोजी या कुटूंबियांची माहिती स्वतंत्र विवरणपत्रात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केली जाणार आहे़ २४ नोव्हेंबर रोजी उपलब्ध माहिती संकेतस्थळावर भरली जाणार आहे़ २५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या काळात जिल्हाधिकारीस्तरावर प्राप्त माहितीचे विश्लेषण केले जाणार असून, कुटूंबियांना कोणत्या योजनेचा लाभ देता येऊ शकतो, याची निश्चिती केली जाणार आहे तर ८ ते २२ डिसेंबर या काळामध्ये निश्चित केलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे़ 

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार