को-व्हॅक्सिनची लस जिल्ह्यात पोहोचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST2021-04-08T04:17:53+5:302021-04-08T04:17:53+5:30
परभणी : को-व्हॅक्सिन लसीला नागरिकांची मोठी मागणी असून, या लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. बुधवारी या लसीचे ९ ...

को-व्हॅक्सिनची लस जिल्ह्यात पोहोचली
परभणी : को-व्हॅक्सिन लसीला नागरिकांची मोठी मागणी असून, या लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. बुधवारी या लसीचे ९ हजार १२० डोस जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. जिल्हा रुग्णालय, महापालिकेची रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची को-व्हॅक्सिन अशा दोन लसी जिल्ह्याला प्राप्त झाल्या होत्या. मात्र, भारत बायोटेकच्या को-व्हॅक्सिन लसीला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. ही मागणी वाढल्याने या लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. गत आठवडाभरापासून जिल्ह्यात को-व्हॅक्सिनची लस उपलब्ध नव्हती. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने ही लस उपलब्ध केली आहे. ७ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून को-व्हॅक्सिन लसीचे ९ हजार १२० डोस प्राप्त झाले असून, या लसीचे केंद्रनिहाय वितरण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. ८ एप्रिलपासून आता काही ठराविक केंद्रांवर लसीकरणासाठी ही लस उपलब्ध होणार आहे.