परभणीत कपड्याच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान
By राजन मगरुळकर | Updated: July 5, 2024 16:39 IST2024-07-05T16:36:29+5:302024-07-05T16:39:46+5:30
परभणी तालुक्यातील पोखर्णी येथील घटना

परभणीत कपड्याच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान
परभणी : तालुक्यातील पोखर्णी येथे एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याची घटना शुक्रवारी पहाटे एक वाजता घडली. या घटनेची माहिती परभणी महापालिकेच्या अग्निशमन दलाला प्राप्त होताच घटनास्थळी अग्निशमन दाखल झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तालुक्यातील पोखर्णी येथील बाळासाहेब नवघरे यांच्या मुद्रांश गारमेंट या दुकानाला आग लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता घडली. याबाबतची माहिती पोखर्णी नरसिंह येथील ग्रामस्थांनी परभणी महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन अधिकारी दीपक कानोडे, फायरमन सर्जेराव मुंडे, रोहित गायकवाड, वाहन चालक इनायत अली हे दाखल झाले. अग्निशमन दलाच्या दोन वाहनांनी आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा केला. दुकान बंद असल्यामुळे सदरील घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे.