शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

मुले पळवणारे समजून पाथरीत दोन चोरट्यांना नागरिकांनी बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 7:28 PM

आज पहाटे मात्र जमावाने चक्क दोन चोरट्यांनाच मुले पळवणारे समजून बेदम चोप दिला.

पाथरी (परभणी ) : मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा जिल्ह्यात जोरात सुरू आहे़ या अफवेतून चोर समजून निष्पापांना मारहाण झाल्याच्या घटना एकीकडे घडल्या असताना आज पहाटे मात्र जमावाने चक्क दोन चोरट्यांनाच मुले पळवणारे समजून बेदम चोप दिला. या दोन्ही चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील निवृत्ती तुकाराम सोळंके यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून तीन चोरट्यांनी त्यांच्या जवळील पैसे लुटून पाथरीकडे पळ काढला़ २० जून रोजी पहाटे हे चोरटे पाथरीच्या दिशेने निघाल्याची माहिती सोळंके यांनी माजलगाव पोलीस आणि छोटेवाडी या आपल्या गावाकडे दिली. त्यानंतर गंगामसला पाटीवर काही जणांनी चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यांच्याही डोळ्यात मिरची पूड टाकून हे चोरटे पाथरीकडे निघाले. पाथरी-तुरा या रस्त्याने निघालेली चोरट्यांची दुचाकी एका खदानीजवळ घसरली आणि चोरटे खाली पडले़ यावेळी खदानीजवळ काम करणाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला़ हे लोक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून एका चोरट्याने चक्क खदानीत उडी मारली तर दोघे चोरटे वेगवेगळ्या दिशेने पळून गेले. काही वेळाने खदानीमधील शेख वजीर शेख सुलेमान (रा़ बालनगर, हैदराबाद) या चोराला पाथरी आणि माजलगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी पकडले.

दरम्यान, याच रात्री पळून गेलेल्या दोघा चोरट्यांपैकी शेख जावेद शेख सुलेमान (रा़ बालनगर हैदराबाद) हा तुरा या गावात शिरला. येथील गावकऱ्यांनी त्याला मुले पळविणाऱ्या टोळीतील समजून बेदम चोप देत पाथरी पोलिसांच्या हवाली केले. तर दुसरा चोरटा करुणाकरन व्यंकटेश तमेरू (रा़ अर्शीमपुरम, हैदराबाद) हा सकाळी पाथरी शहराजवळील आष्टीफाट्यावर पोहचला. या ठिकाणीही ग्रामस्थांचा तोच समज झाला. ग्रामस्थांनी त्याला शेत आखाड्यावर नेऊन मारहाण केली. यानंतर याची माहिती पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आखाड्यावर येत आरोपीस ताब्यात घेतले. 

टॅग्स :ThiefचोरKidnappingअपहरणparabhaniपरभणी