परभणी शहरातून मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:12 IST2017-11-30T01:12:01+5:302017-11-30T01:12:15+5:30

शहरातून एका १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली आहे़

Child abduction from Parbhani city | परभणी शहरातून मुलाचे अपहरण

परभणी शहरातून मुलाचे अपहरण

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातून एका १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली आहे़
करण मारोती वाघमारे हा नववी वर्गात शिक्षण घेत होता़ २२ नोव्हेंबर रोजी नैसर्गिक विधीसाठी करण घराबाहेर पडला़ मात्र तो परत आला नाही़ आपल्या मुलाचे कोणीतरी अपहरण केले असावे, असा संशय मुलाच्या वडिलांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे़ त्यावरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे़

Web Title: Child abduction from Parbhani city