मीटर बिलावरून झाला चाकूहल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:08 IST2019-04-06T00:08:31+5:302019-04-06T00:08:49+5:30
लोकमान्यनगर भागात ४ एप्रिल रोजी मध्यरात्री झालेली मारहाण मीटरच्या बिलावरुन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मीटर बिलावरून झाला चाकूहल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : लोकमान्यनगर भागात ४ एप्रिल रोजी मध्यरात्री झालेली मारहाण मीटरच्या बिलावरुन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी रात्री चाकूचे वार करून एकास जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात जखमी सुधाकर सोळुंके यांनी शुक्रवारी नवा मोंढा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सामायिक मीटरचे बिल भरण्यासाठी उशीर झाला होता. त्यातूनच आपल्याला चाकूने मारहाण झाली. या फिर्यादीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात सागर चव्हाण आणि साई चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश मलपिल्लू या प्रकरणाचा तपास करीत आहेत. या प्रकरणात साई चव्हाण यास अटक केली असून, न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले.