प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:07+5:302021-02-05T06:06:07+5:30

प्राचार्य यु.एम.शिंदे, प्रा. मोहन लोहट, लहु घरजाळे, अनंतराव खुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. संध्या जाधव, दिपाली पौळ, ...

Celebrate Republic Day with enthusiasm | प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

प्राचार्य यु.एम.शिंदे, प्रा. मोहन लोहट, लहु घरजाळे, अनंतराव खुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. संध्या जाधव, दिपाली पौळ, अभिनव खुळे, विशाल बोबडे, शुभांगी फफाळ,ऋतुजा वारे, आदर्श खुळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. हर्षदा थावरे, ज्योती ढगे यांनी सूत्रसंचालन केले. घरजाळे यांनी आभार मानले.

अनवर पठाण यांचा सत्कार

परभणी: प्रजासत्ताकदिनानिमित्त येथील पोलीस विभागातील प्रशासकीय विभागातील कर्मचारी अनवर शेरदिल पठाण यांचा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सायबर सेलमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक कौशल्य वापरुन अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली. या पोलीस ठाण्याच्या कार्याची दखल घेऊन प्रजासत्ताकदिनी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या हस्ते ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

मनपात ध्वजारोहण

परभणी: येथील महानगरपालिकेत महापौर अनिता रविंद्र सोनकांबळे यांच्या हस्ते प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आ.सुरेश वरपूडकर, आयुक्त देविदास पवार, स्थायी समितीचे सभापती गुलमीर पठाण यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अब्दुल रहेमान पठाण यांचा सत्कार

परभणी: जिल्हा स्टेडियम मैदानावर पार पडलेल्या मुख्य ध्वजारोहण सोहळ्यात पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते महानगर पालिकेचे ग्रंथपाल अब्दुल रहेमान खान यांचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, पोलीस अधीक्षक जयंत मीना, आयुक्त देविदास पवार आदीची उपस्थिती होती.

ज्ञानगंगा विद्यालय

परभणी: काकडेनगरातील ज्ञानगंगा विद्यालयात आयोजित कार्यक्रमास अच्युत महाराज दस्तापूरकर, संस्थाध्यक्ष भारतराव सोळंके, मुख्याध्यापक अमित सोळंके, शंकरराव काकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले.

संस्कृती विद्यानिकेतन

परभणी: संचालक अक्षय देसरडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. शेख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सरोज देसरडा यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

नवनजीवन नगर

परभणी: शहरातील नवजीवननगरातील प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी रिपाइंचे राज्य सचिव ॲड. लक्ष्मणराव बनसोडे, गुलाब वाघमारे, गोपीनाथ कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक कार्यातील योगदानाबाद्दल डॉ.बालासाहेब कांबळे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गुलाब वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश बानमारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशिला ढाले, दैवशाला गायकवाड, पंचशीला कांबळे, सूर्यकला थिटे आदींनी प्रयत्न केुले.

Web Title: Celebrate Republic Day with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.