कारला-कुंभारी रस्ता कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:21+5:302021-02-08T04:15:21+5:30
बसपोर्टच्या कामाचा निधी गेला कोठे? परभणी : येथील बस स्थानकाचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात ...

कारला-कुंभारी रस्ता कामाला गती
बसपोर्टच्या कामाचा निधी गेला कोठे?
परभणी : येथील बस स्थानकाचे रूपांतर बसपोर्टमध्ये करण्यासाठी १३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, ३० लाख रुपयांचे बिल संबंधित विभागाकडे कंत्राटदारांचे थकले आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी या बसपोर्टचे काम बंद केले आहे. त्यामुळे मंजूर असलेला निधी गेला कुठे, असा प्रश्न परभणीकरांकधून विचारला जात आहे.
ना जागा ना निधीची उपलब्धता
परभणी : जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, मानवत, पूर्णा या तालुक्यातील क्रीडांगणासाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र, सोनपेठ, परभणी, पाथरी, गंगाखेड व पालम तालुक्याच्या क्रीडांगणासाठी ना जागा उपलब्ध आहे, ना त्यासाठी निधीची उपलब्धता आहे.
रखडलेली कामे पूर्ण करण्याची मागणी
परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेली रस्त्याची कामे सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाने आता परवानगी दिली आहे. मात्र, अद्यापपर्यंत एकाही रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. कामे पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
विहिरींच्या कामावर प्रश्नचिन्ह
परभणी : जिल्ह्यातील ग्रामस्थांची उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी, यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर योजना अंमलात आणली. मात्र, या योजनेतील विहिरींच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.