Callgirl's murder at Manavat; Filed a crime against anonymity | मानवत येथे कॉलगर्लचा खून; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

मानवत येथे कॉलगर्लचा खून; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

मानवत:शहरातील फुले नगरात राहणाऱ्या 43 वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी रात्री 9:30 वाजता उघडकीस आली. या प्रकरणी 22 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरांतील फुले नगरात तब्बूसुम बडेशहा शेख (43)ही महिला आपल्या मालकीच्या घरात एकटी राहत होती. तसेच ही महिला मागील काही वर्षांपासून वैश्या व्यवसाय करीत होती अशी माहिती पोलिसांनी दिली. 21 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास शेजारी राहणारी महिला तब्बूसुम यांना बोलण्यासाठी गेली असता त्या जमिनीवर संशयास्पद अवस्थेत पडलेली दिसल्या. नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर सपो नि भरत जाधव, जमदार अनिल केंद्रे, नारायण सोळंके, महिला पोलीस कर्मचारी सविता भारशंकर, निर्मला गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

घरातील खोलीची पाहणी केली असता तब्बसूम खोलीमध्ये  मृतावस्थेत आढळून आल्या. तसेच त्यांच्या खोलीमधील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले आढळून आल्याने घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आला.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण केले. श्वानपथकाने पशुवैद्यकीय दवाखाना मुख्य रस्त्या पर्यंत माग काढल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सपोनि भरत जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पुणे रमेश स्वामी हे करीत आहेत. 

Web Title: Callgirl's murder at Manavat; Filed a crime against anonymity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.