तीन एकरवरील ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 00:22 IST2017-11-18T00:22:22+5:302017-11-18T00:22:40+5:30
वीज तारेच्या स्पार्किगमुळे तीन एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या झोला रोड परिसरात १७ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली़

तीन एकरवरील ऊस जळाला
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : वीज तारेच्या स्पार्किगमुळे तीन एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना येथून जवळच असलेल्या झोला रोड परिसरात १७ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली़
गंगाखेड शहरातील विजय भारत मुरकुटे यांनी दत्त मंदिर परिसरातील झोला रोड शिवारात ६ एकरवर उसाची लागवड केली आहे़ शेत परिसरातून महावितरणच्या वीज तारा गेल्या आहेत़ शुक्रवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास वीज तारांमध्ये स्पार्किग होऊन उसाला आग लागली़ ही घटना समजल्यानंतर अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले़ गंगाखेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला; परंतु, तोपर्यंत तीन एकरवरील ऊस जळून खाक झाला होता़