गंगाखेडमध्ये घरफोडी; सव्वा लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:15 IST2021-01-04T04:15:31+5:302021-01-04T04:15:31+5:30
पडेगाव येथील सुनीता वरकडे या २ जानेवारी रोजी रात्री घराला कुलूप लावून वडिलांच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. ३ ...

गंगाखेडमध्ये घरफोडी; सव्वा लाख लांबविले
पडेगाव येथील सुनीता वरकडे या २ जानेवारी रोजी रात्री घराला कुलूप लावून वडिलांच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. ३ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गल्लीत गर्दी कशामुळे झाली, याची पाहणी करण्यासाठी त्या घराजवळ गेल्या तेव्हा त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर घरात जाऊन पाणी केली असता, कपाटाचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी रोख २० हजार रुपये, ३ ग्रॅम सोन्याचे झुंबर, ६ ग्रॅम सोन्याचे गंठण, ८ ग्रॅम सोन्याची बोरमाळ, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, गळ्यातील १ ग्रॅम पोत आदी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.