शेतात घर बांधकाम करणा-यांना भरावा लागणार कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:01+5:302021-02-05T06:04:01+5:30
ग्रामीण भागात जुन्या गावात वास्तव्यास राहताना अनेक नागरिकांना जागेची मोठी समस्या येते. त्यावेळी गावालगत स्वतः च्या मालकीच्या शेतात रस्त्यालगत ...

शेतात घर बांधकाम करणा-यांना भरावा लागणार कर
ग्रामीण भागात जुन्या गावात वास्तव्यास राहताना अनेक नागरिकांना जागेची मोठी समस्या येते. त्यावेळी गावालगत स्वतः च्या मालकीच्या शेतात रस्त्यालगत अनेकांनी घरे बांधकाम केले आहेत. शासनाच्या नियमानुसार शेती व्यतिरिक्त जागेचा वापर करावयाचा असल्यास अकृषिक मंजूरी तहसिल कार्यालया कडून घेणे बंधनकारक असते, पण शासकीय नियमाच्या कटकटीचे नको हा विचार करून शेतात घरे बांधून वापर केला जात आहे. यासाठीचा कोणत्याही प्रकारचा कर भरला जात नाही. याची चौकशी करून प्रत्येक गावात अकृषिक परवाना न घेता किती जणांनी घरे बांधली आहेत.त्यांची यादी करून १ हजार चौरस फुटासाठी ७०० च्या आसपास कर आकारला जाणार आहे. उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी यासाठी स्वतंत्र मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक गावात तलाठ्याने ही कर वसुली करावयाची आहे. पालम तालुक्यात अंदाजे ४ हजार घरे या प्रकारात मोडण्याची शक्यता असून, लाखोंचा महसूल शासनाला वसुल करता येणार आहे.