- प्रशांत मुळी
येलदरी वसाहत (परभणी): "आईचं काळज ते आईचंच!" याची प्रचिती देणारी एक अंगावर शहारे आणणारी घटना जिंतूर तालुक्यातील येलदरी वसाहतीमध्ये घडली आहे. आपल्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या दिशेने येणारा काळ पाहून, एका माऊलीने स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता थेट फणा काढलेल्या नागाच्या अंगावरून उडी मारत लेकीचे प्राण वाचवले. मोनाली जाधव असे या धाडसी माऊलीचे नाव असून, त्यांनी आपल्या लेकीला मृत्यूच्या जबड्यातून सुखरूप बाहेर काढले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोनाली जाधव यांच्या अचाट धैर्याचे कौतुक होत असून, "लेकरावर संकट आल्यावर आई वाघीण होते," हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
काळ समोर उभा असताना घेतला धाडसी निर्णयमिळालेल्या माहितीनुसार, येलदरी वसाहतीमधील रहिवासी मोनाली रवी जाधव या शनिवारी सायंकाळी कामानिमित्त घराच्या मागच्या बाजूला आपली दोन वर्षांची मुलगी रेणुका हिला घेऊन गेल्या होत्या. त्याच वेळी दबा धरून बसलेला एक मोठा जहाल विषारी नाग अचानक रेणुकाच्या अगदी पायापाशी आला. समोर साक्षात मृत्यू उभा असल्याचे पाहून कोणाचीही गाळण उडाली असती, मात्र मोनाली यांनी क्षणार्धात निर्णय घेतला.
नागावरून उडी अन चिमुकली सुरक्षितनाग रेणुकाच्या अंगावर झडप घालणार इतक्यात मोनाली यांनी विलक्षण चपळाईने चक्क त्या नागाच्या अंगावरून उडी घेतली आणि रेणुकाला अलगत आपल्या कवेत ओढले. आईच्या या साहसामुळे चिमुकल्या रेणुकाचे प्राण थोडक्यात वाचले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि शेजारी राहणारे प्रवीण मुळी यांनी तातडीने वन विभागाला पाचारण केले.
वन विभागाची मदत आणि नागाला जीवदानघटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे अधिकारी व्हि.बी. चाटसे आणि सर्पमित्र प्रमोद भालेराव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने त्या नागाला पकडले आणि सुरक्षितरीत्या त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. सध्या सोशल मीडियावर या 'धाडसी आई'चा व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Web Summary : In Yeldari, a mother, Monali Jadhav, fearlessly jumped over a venomous snake to save her two-year-old daughter, Renuka. The snake was about to strike when Monali acted swiftly, rescuing Renuka unharmed. Forest officials captured and released the snake, with Monali hailed as a hero.
Web Summary : येलदारी में, मोनाली जाधव नामक एक माँ ने अपनी दो साल की बेटी रेणुका को बचाने के लिए एक जहरीले सांप के ऊपर छलांग लगा दी। सांप हमला करने ही वाला था कि मोनाली ने तेजी से कार्रवाई करते हुए रेणुका को सुरक्षित बचा लिया। वन विभाग के अधिकारियों ने सांप को पकड़कर छोड़ दिया, मोनाली की बहादुरी की सराहना हो रही है।