वह्या आणण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:47 IST2021-02-20T04:47:47+5:302021-02-20T04:47:47+5:30

पाथरी शहरातील शाहूनगर भागातील संपदा सुभाष घुले (वय २०) ही तरुणी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दुकानातून वह्या ...

The body of a young woman who went to fetch books was found | वह्या आणण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला

वह्या आणण्यासाठी गेलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला

पाथरी शहरातील शाहूनगर भागातील संपदा सुभाष घुले (वय २०) ही तरुणी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दुकानातून वह्या आणण्यासाठी जात आहे, असे सांगून स्कुटी घेऊन गेली होती. बराच वेळ झाल्यानंतरही ती परत आली नसल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरू केली. या तरुणीचा मोबाईल नंबरही लागत नव्हता. त्यानंतर याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात सदरील मुलगी हरवल्याची तक्रार देण्यात आली होती. याच दरम्यान ढालेगाव येथील पुलाजवळ एक स्कुटी व चप्पल आढळून आली. त्यानंतर भोई समाजबांधवांच्या मदतीने गोदावरी नदीपात्रात दोन दिवस या तरुणीचा शोध घेण्यात आला. गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात या तरुणीचा मृतहेद पाण्यावर तरंगताना आढळून आला. याप्रकरणी मयत मुलगी संपदा हिचे काका गोविंद उद्धव घुले यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामध्ये परीक्षेत चांगले गुण मिळत नसल्याने संपदाने आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: The body of a young woman who went to fetch books was found