गोदावरी नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 17:32 IST2020-02-04T17:31:31+5:302020-02-04T17:32:34+5:30

मृतदेहावर जागीच शवविच्छेदन करून दफनविधी करण्यात आला.

The body of a stranger is found in the river Godavari at Gangakhed | गोदावरी नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

गोदावरी नदी पात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

गंगाखेड: परभणी रस्त्यावर असलेल्या खळी पाटी पुलाखालील गोदावरी नदीच्या पात्रात अंदाजे ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह मिळून आला आहे. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहावर जागीच शवविच्छेदन करून दफनविधी करण्यात आला.

गंगाखेड परभणी रस्त्यावर असलेल्या खळी पाटीजवळील गोदावरी नदी पुलाच्या खाली पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्याने गंगाखेड पोलीस ठाण्याचे सपोनि राजेश राठोड, जमादार त्र्यंबकराव शिंदे, पो.ना. रामकीशन कोंडरे, दत्तात्रय पडोळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता पाण्यात तरंगणारा अनोळखी इसमाचा फुगलेला मृतदेह आढळून आला. यानंतर पोलीस पाटील संगिता कचरे, लक्ष्मण कचरे, कृष्णा बाबासाहेब बिजले, श्रीनिवास केशवराव कचरे यांच्या सहकार्याने  पाण्यातील मृतदेह बाहेर काढला. 

कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची भयंकर दुर्गंधी येत असल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वसीम खान, प्रशांत राठोड यांना घटनास्थळी पाचारण केले. मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करून करण्यात आला. पुढील तपास सपोनि राजेश राठोड, जमादार हरिभाऊ शिंदे हे करीत आहेत.

Web Title: The body of a stranger is found in the river Godavari at Gangakhed