शासकीय रुग्णालयात खासगी लॅबद्वारे रक्ततपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:19+5:302021-05-07T04:18:19+5:30

परभणी : येथील आयटीआय कोविड सेंटरमध्ये खासगी लॅबमधील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णांची रक्त तपासणी करून आर्थिक लूट केली जात असल्याची ...

Blood tests by a private lab at a government hospital | शासकीय रुग्णालयात खासगी लॅबद्वारे रक्ततपासणी

शासकीय रुग्णालयात खासगी लॅबद्वारे रक्ततपासणी

Next

परभणी : येथील आयटीआय कोविड सेंटरमध्ये खासगी लॅबमधील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णांची रक्त तपासणी करून आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी महालॅब कार्यान्वित आहे. असे असताना खासगी लॅबच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रुग्णांची रक्त तपासणी केली जात आहे. वेलनेस लॅब या खासगी लॅबच्या माध्यमातून रक्त तपासणी करीत प्रती तपासणी ३ हजार ५०० रुपये घेतले जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर आयटीआयच्या विभागप्रमुखांनी तत्काळ खासगी लॅबच्या कर्मचाऱ्यांना रक्ताचे नमुने व रक्त तपासणीचे प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये परत केले. तसेच महालॅबच्या माध्यमातून मोफत रक्त तपासणी करण्यात आली. शासकीय कोविड केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या चाचण्या व उपचार मोफत असताना रुग्णांना खासगी लॅबमार्फत तपासणी करायला लावली जात आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘प्रहार’चे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, पिंटू कदम, ज्ञानेश्वर पंढरकर आदींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: Blood tests by a private lab at a government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.