परमार्थातील आनंद परमोच्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:15 IST2021-02-08T04:15:18+5:302021-02-08T04:15:18+5:30
देवगाव फाटा : नागरिकांनी संसाराबरोबरच परमार्थ केला पाहिजे. परमार्थामध्ये जो आनंद आहे, तो जगाच कुठेच मिळत नाही, असे प्रतिपादन ...

परमार्थातील आनंद परमोच्च
देवगाव फाटा : नागरिकांनी संसाराबरोबरच परमार्थ केला पाहिजे. परमार्थामध्ये जो आनंद आहे, तो जगाच कुठेच मिळत नाही, असे प्रतिपादन ह.भ.प. रखमाजी महाराज सातपुते यांनी केले.
देवगाव फाटा येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या १३३ व्या अखंड हरिनाम सप्ताहातील सांगताप्रसंगी आयोजित काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. रखमाजी महाराज बोलत होते. यावेळी सातपुते म्हणाले, श्रीकृष्ण हे भगवान आहेत, हे ब्रह्मदेवांना कळले नाही. कारण श्रीकृष्णाने गोकुळातील लोणी व वासरे चोरली. भगवान श्रीकृष्णाने गोपाळांचे उष्टे खाताना ब्रह्मदेवाने पाहिले. त्यावरून हे भगवान श्रीकृष्ण असू शकत नाहीत, याची ब्रह्मदेवांना खात्री झाली होती. भगवंताने राम अवतारात शबरीचे उष्टी बोरे खाल्ली होती. हे ब्रह्मदेव विसरले. ब्रह्मदेवाने श्रीकृष्णाला ओळखले नाही. अशा प्रकारे श्रीकृष्णचरित्राचे सुमधुर वाणीने वर्णन केले. शरीर हे नाशवंत आहे, त्याचा अजिबात मोह धरू नका, असे संप्रदायातील गुरू संत ज्ञानेश्वर यांचे विचारही सातपुते महाराज यांनी सांगितले. या सप्ताहात सात दिवस विविध समाजप्रबोधन कार्यक्रम पार पडले. भजनी मंडळी, गायनाचार्य, मुदंगाचार्य यांनी प्रयत्न केले. कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.