शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

राज्यातील शेती व्यवसायाला भाजप सरकारकडून धोका : शंकरअण्णा धोंडगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:14 IST

सरकारचे धोरणच समजत नाहीत. शेती व्यवस्था अस्थीर करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला सरकारकडून धोका असल्याची भावना निर्माण झाली असून, भांबावलेल्या शेतक-यांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्यभर शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू केल्याची माहिती या अभियानाचे निमंत्रक केशवअण्णा धोंडगे यांनी दिली.

परभणी, दि. 1 :  सरकारचे धोरणच समजत नाहीत. शेती व्यवस्था अस्थीर करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. त्यामुळे शेती व्यवसायाला सरकारकडून धोका असल्याची भावना निर्माण झाली असून, भांबावलेल्या शेतक-यांना सुरक्षा देण्याच्या हेतूने राज्यभर शेतकरी, शेतमजूर सुरक्षा अभियान सुरू केल्याची माहिती या अभियानाचे निमंत्रक केशवअण्णा धोंडगे यांनी दिली.

राज्यात शेती आणि शेतकरी असुरक्षित झाली आहे. शासनाच्या धोरणांमुळे शेतक-यांची आर्थिक फरफट होत आहे. शेतक-यांना अस्थिर करायचे आणि कालांतराने कार्पोरेट शेती विकसित करायची, असा शासनाचा डाव असल्याचे सध्याच्या स्थितीवरुन दिसते. कारण गरज नसताना शेतीमालाची आयात करणे, विदेशात जमिन किरायाने घेऊन तेथे शेती मालावर प्रक्रिया करणे यासारखे निर्णय हे शासन घेत आहे. देशात शेतीमालाचे दर निच्चांकी ठेवण्यावर शासनाचा भर आहे. या सर्व धोरणांमुळे शेती व्यवसायालाच सरकारकडून धोका निर्माण झाला आहे.

अशा परिस्थितीत शेतक-यांना धीर देण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून सरकारविरोधी लढा उभारण्यासाठी ९ आॅगस्टपासून हे अभियान सुरू केले असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. शेती व्यवसायाला संरक्षण द्यावे, शेतमालाचे भाव ठरविणा-या आयोगाला वैधानिक दर्जा द्यावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. आतापर्यंत राज्यात २३ ठिकाणी सभा घेतल्या असून, या अभियानात सत्ताधारी, विरोधी अशा शेतक-यांवर प्रेम करणा-या सर्वांनाच सामावून घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध मागण्या आम्ही शासनासमोर ठेवल्या आहेत. 

सरकारला वठणीवर आणण्यासाठी २ आॅक्टोबरनंतर राज्यभरात शेतक-यांचे असहकार आंदोलन केले जाणार असल्याचे धोंडगे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी खा.गणेशराव दुधगावकर, महंमद गौस, राकाँ किसान सभेचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र रोडगे, संतोष देशमुख, सुमंत वाघ, नंदू शिंदे, मंचकराव बचाटे, साथी रामराव जाधव, आदींची उपस्थिती होती.