हक्काच्या पीक विम्यासाठी भाजपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST2021-06-09T04:22:14+5:302021-06-09T04:22:14+5:30
जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पीक विमा परतावा रिलायन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा ...

हक्काच्या पीक विम्यासाठी भाजपचे आंदोलन
जिल्ह्यात मागील वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा पीक विमा परतावा रिलायन्स विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे अपेक्षित असताना त्यास टाळाटाळ केली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरून विमा परतावा देण्याचे मान्य केले असतानाही शेतकऱ्यांना विमा परतावा न मिळाल्याने मंगळवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात भाजप व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आ. मेघना बोर्डीकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, शेतकरी संघटनेचे विश्वंभर गोरवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात बाळासाहेब जाधव, बाळासाहेब भालेराव, समीर दुधगावकर, डॉ. पंडित दराडे, सुशील खेडकर, शिवाजी दिवटे, कृष्णाजी सोळंके, अनंत पारवे, प्रा. शिवराज नाईक, गणेश पाटील, सागर काळे यांच्यासह भाजप पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.