शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

युतीत जागा सेनेला सुटल्याने गंगाखेडच्या भाजपा पदाधिकाऱ्यांचा आत्मक्लेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 7:04 PM

टाळ, मृदंगाच्या गजरात भजन करीत आत्मक्लेष आंदोलन

गंगाखेड: भाजपा, शिवसेना, रासपा, रिपाइंच्या महायुतीत गंगाखेड विधानसभेची जागा शिवसेनेला सोडून भाजपच्या वरिष्ठांनी पक्षातील  पदाधिकाऱ्यांवर अन्याय केल्याचे सांगत मंगळावारपासून (दि. १) शहरातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी संत जनाबाई मंदीरात आत्मक्लेष आंदोलन सुरू केले आहे.

परभणी जिल्हयातील भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असलेल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघाची उमेदवारी देतांना विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या भाजपाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांवर अन्याय करत भाजपाकडील ही जागा मित्र पक्ष शिवसेनेला सोडून वरिष्ठांनी आमच्यावर अन्याय केला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक निष्ठेने काम करीत विजय प्राप्त करण्यासाठी जीवाचे रान करून सुद्धा उमेदवारी देतांना गंगाखेड विधानसभेबाबत वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर फेरविचार व्हावा यासाठी दि. १ ऑक्टोबर मंगळवार रोजी संत जनाबाई मंदिरात सर्व पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याकरिता टाळ, मृदंगाच्या गजरात भजन करीत आत्मक्लेष सुरू केले आहे.  

निर्णयाचा फेरविचार करावा वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयावर फेरविचार होत नाही तोपर्यंत हे आत्मक्लेष असेच सुरू राहणार असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने सांगितले. यामध्ये प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रबदडे, विधानसभा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम, गणेशराव रोकडे, संघटन मंत्री बाबासाहेब जामगे, बालाजी देसाई, अॅड. व्यंकटराव तांदळे, नंदकुमार सुपेकर, गोविंद रोडे, विश्वनाथ अप्पा सोळंके, आनंदराव बनसोडे, कृष्णा सोळंके, सत्यनारायण गव्हाणकर, श्रीनिवास मोटे, रामराजे फड, सुनिल छाजेड, जगन्नाथ आंधळे, भास्करराव भिसे, सचिन लटपटे, मच्छिंद्र नवघरे, ज्ञानेश्वर डाके, संतोष टोले, प्रशांत फड, मनोज मुरकुटे, ओम आंधळे, शिवराज गुट्टे आदींसह गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते. 

विशेष म्हणजे, भाजपा पदाधिकाऱ्यांच्या आत्मक्लेष आंदोलनात शिवसेनेतर्फे विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक असलेले शिवसेनेचे विधानसभा प्रमुख बालासाहेब निरस यांच्याबरोबरच रासपाचे जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, वसंतराव चोरघडे, सुरेश नळदकर यांनीही आपली उपस्थिती लावली होती.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीgangakhed-acगंगाखेडShiv SenaशिवसेनाBJPभाजपा