शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

परभणीची महापौर, उपमहापौर निवडीची विशेष सभा पुढे ढकलली, नवी तारीख कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:21 IST

महापौर पदासाठी १४ आणि उपमहापौर पदासाठी सात अर्ज आले आहेत.

परभणी : महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी ९ फेब्रुवारीला विशेष सभा होणार होती. मंगळवारी रात्री विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी परभणी मनपाच्या या प्रक्रिये संदर्भात नवीन आदेश काढून ही निवड प्रक्रिया १२ फेब्रुवारीला घेण्यात यावी असे आदेशित केले आहे. 

महापौर आणि उपमहापौर या पदांसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. महापौर पदासाठी १४ आणि उपमहापौर पदासाठी सात अर्ज आले. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निकालाची मतमोजणी याच दिवशी असल्याने मनपाची महापौर उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया १२ फेब्रुवारीला घेण्यात यावी असे सुधारित आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांना दिले आहेत.

महापौरपदासाठी १४, उपमहापौर पदासाठी सात नामनिर्देशन दाखल महापालिकेच्या नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत महापौर पदासाठी एकूण १४ तर उपमहापौर पदासाठी सात नाम निर्देशन पत्र दाखल झाले आहेत. यामध्ये उपमहापौर पदासाठी उद्धव सेना १, भाजप २, राष्ट्रवादी एक, काँग्रेस तीन नगरसेवकांचे अर्ज दाखल झाले. खेळीमेळीच्या वातावरणात एकत्रित भरलेले हे अर्ज पाहता आता माघारीसाठी कोणाचा बळी घेतला जाणार हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. 

महापौरपदासाठीचे सादर नामनिर्देशनउमेदवार प्रभाग पक्षसय्यद समी ८ड उद्धवसेनास. इकबाल स. खाजा ८ क उद्धवसेनाश्याम खोबे १६ क उद्धवसेनाशरफुद्दीन सिद्दिकी ३ड उद्धवसेना दिलीपसिंह ठाकूर ९ड उद्धवसेनाप्रतिभा सरोदे ४अ उद्धवसेनामीना वरपुडकर ५ क भाजपडॉ. केदार खटिंग १५ ३ भाजपतिरूमला खिल्लारे १ ब भाजपरितेश झांबड ५ड भाजपभगवान वाघमारे ९अ काँग्रेसगणेश देशमुख १ड काँग्रेसगुलमीर खान ७ क काँग्रेसअर्जुन सामाले १० क राष्ट्रवादी (अ.प.)

उपमहापौरपदासाठीचे दाखल नामनिर्देशनउमेदवार प्रभाग पक्षभगवान वाघमारे ९अ काँग्रेसगणेश देशमुख १ड काँग्रेसगुलमीर खान ७क काँग्रेसश्याम खोबे १६ क उद्धवसेनातिरुमला खिल्लारे १ ब भाजपविश्वजीत बुधवंत ४ क भाजपनाजेमा बेगम ६ब राष्ट्रवादी (अ.प.)

महापौर पदासाठी पक्षनिहाय अर्ज उद्धव सेना ६ भाजप ४ राष्ट्रवादी १ काँग्रेस ३

टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६