- राजन मंगरूळकर परभणी : परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीची प्रतीक्षा आता संपली आहे. या निवडीसाठी विशेष सभेची बैठक ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी परभणीचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांना मंगळवारी पत्र पाठविले आहे.
परभणी महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया राबविण्यासाठी मुंबई प्रांतिक महापालिका निवडणूक नियम २००५ व सुधारणा नियम २००६ अन्वये प्राप्त अधिकारानुसार विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना प्राधिकृत केल्याचे पत्र काढले आहे. यानुसार ही महापौर आणि उपमहापौर यांची निवड प्रक्रिया आता ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणार आहे.
असे आहे पक्षनिहाय संख्याबळ उद्धव सेना २५काँग्रेस १२भाजप १२ राष्ट्रवादी अजित पवार ११ जन सुराज्य पक्ष ३ यशवंत सेना १ अपक्ष १ एकूण ६५
यांची गटनेतेपदी निवडउद्धव सेनेचे गटनेते म्हणून दिलीपसिंह ठाकुर, काँग्रेसचे गटनेते म्हणून गुलमीर खान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटनेते विजय जामकर, भाजप गटनेते म्हणून तिरुमला खिल्लारे यांची निवड झाली आहे.
Web Summary : Parbhani Municipal Corporation's mayor and deputy mayor election set for February 9th. Divisional Commissioner authorized the District Collector for the election process. Shiv Sena has 25 seats, Congress and BJP have 12 each, and NCP has 11.
Web Summary : परभणी महानगरपालिका के महापौर और उपमहापौर का चुनाव 9 फरवरी को होगा। संभागीय आयुक्त ने चुनाव प्रक्रिया के लिए जिलाधिकारी को अधिकृत किया। शिवसेना के पास 25 सीटें, कांग्रेस और भाजपा के पास 12-12 और राकांपा के पास 11 सीटें हैं।