मोठी कारवाई ! संचारबंदीत कापड दुकान उघडे ठेवणाऱ्यास ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 14:14 IST2021-05-19T14:13:38+5:302021-05-19T14:14:40+5:30
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आणि नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई केली.

मोठी कारवाई ! संचारबंदीत कापड दुकान उघडे ठेवणाऱ्यास ५० हजारांचा दंड
पाथरी : कोरोनाचा प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या संचारबंदीचे काही व्यापारी उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बुधवारी ( दि.१९ ) पोलीस आणि नगर परिषद यांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील पंचायत समितीच्या कॉम्प्लेक्समधील न्यू बॉम्बे कलेक्शन या कापड दुकानदाराला 50 हजाराचा दंड ठोठावला आहे. तर दुसऱ्या एका कारवाईत एका मोबाईल शॉपी मालकाला ७ हजाराचा दंड ठोठावला आहे
पाथरी शहरात स्थानिक पोलिस प्रशासन आणि नगर पालिका प्रशासनाच्यावतीने 'ब्रेक दि चैन' या अंतर्गत कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, काही व्यापारी संचारबंदीचे उल्लंघन करून व्यापार करत असल्याचे आढळून येत आहे. यामुळे बुधवारी पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर संयुक्त कारवाई केली. यावेळी पंचायत समितीच्या कॉम्प्लेक्समधील शहरातील सर्वात मोठे बॉम्बे कलेक्शन या कापड दुकानावर नियमांचे उल्लंघन करून दुकान उघडे ठेवल्याने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर दुसऱ्या एका कारवाईत बाबा टॉवर कॉम्प्लेक्समधील अर्श मोबाईल शॉपी मालकाला ७ हजाराचा दंड ठोठावला आहे.
ही कारवाई नगरपालिका मुख्याधिकारी कारभारी दिवेकर सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सोमवंशी पोलीस नायक शाम काळे, शेख गौस ,सम्राट कोरडे आणि नगर परिषद नियुक्त पथकातील कर्मचारी राजू विश्वामित्रे, बी.यु.भाले, बळवंत दिवाण, संतोष हुले, शेख मुस्तफा, अन्सारी रंबानी, वाडेकर , खुर्रम खान, जमील अन्सारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.