रंगमंच व संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:16 IST2021-04-18T04:16:20+5:302021-04-18T04:16:20+5:30
अपर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे यांच्या पुढाकारातून अजिंठानगर येथे रंगमंच व संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. या कामासाठी २५ ...

रंगमंच व संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन
अपर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे यांच्या पुढाकारातून अजिंठानगर येथे रंगमंच व संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. या कामासाठी २५ लाख रुपयांचा निधी प्राप्त आला आहे. दोन दिवसांपूर्वी आ डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी महापौर अनिता सोनकांबळे, सहायक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, विजय वाकोडे, गौळण रोडे, रवी सोनकांबळे, नगरसेवक चंदू शिंदे, डॉ. विवेक नावंदर, यशवंत खाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्ष ज्योती बगाटे (धूतराज) आदी उपस्थित होते. पू. आर्याजी सुचितानंद बोधी यांनी त्रिशरण, पंचशील दिले. कार्यक्रमादरम्यान वीरमाता वेणूताई मकरंद व सुनीताताई गोडबोले यांचा सन्मान करण्यात आला.
सर्व प्रमुख मान्यवरांचा भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.
विविध स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. लेजीम पथकाने नेत्रदीपक सादरीकरण केले. त्यास उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.
ज्योती बगाटे यांनी प्रास्ताविक केले. कोमल नरवाडे यांनी सूत्रसंचालन केले. लखन सौदरमल यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी द्वारकाबाई गंडले, रामचंद्र रोडे, लखन सौदरमल, बी. आर. जाधव, अतुल थोरात, आम्रापाली घोडके, नंदा गायकवाड, तेजस नरवाडे, लक्ष्मीकांत धूतराज आदींनी प्रयत्न केले.