जल्लोषात आणि संयमाने साजरी होणार भीमजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST2021-03-26T04:17:43+5:302021-03-26T04:17:43+5:30

परभणी : मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी साजरी करण्यात आली. मात्र, यावर्षी कोरोनाच्या नियमांचे ...

Bhim Jayanti will be celebrated with pomp and ceremony | जल्लोषात आणि संयमाने साजरी होणार भीमजयंती

जल्लोषात आणि संयमाने साजरी होणार भीमजयंती

परभणी : मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी साजरी करण्यात आली. मात्र, यावर्षी कोरोनाच्या नियमांचे पालन करीत जल्लोषात आणि संयमाने जयंती साजरी करण्याचा निर्णय २४ मार्च रोजी येथे पार पडलेल्या जिल्ह्यातील जयंती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व जयंती मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बी. रघुनाथ सभागृहात पार पडली. रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस महापौर अनिताताई रवींद्र सोनकांबळे, रिपाइंचे केंद्रीय उपाध्यक्ष डाॅ. सिद्धार्थ भालेराव, रिपाइंचे राज्य सचिव डी.एन. दाभाडे, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे, प्रकाश कांबळे, नगरसेवक उत्तम खंदारे, दादाराव पंडित, नगरसेवक ॲड. धम्मा जोंधळे, सुशील कांबळे, मिलिंद सावंत, अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, अर्जुन पंडित, सह्याद्री फाऊंडेशनचे सुधीर साळवे, द्वारकाबाई गंडले, अनिता सरोदे, ॲड. विष्णू ढोले, दीपक ठेंगे, ओमप्रकाश गायकवाड, पवनकुमार शिंदे, आशिष वाकोडे, रणधीर भालेराव, सूर्यकांत रायबोले, शरद चव्हाण, चंद्रकांत लहाने, मिलिंद बामणीकर, मंकच खंदारे, सिद्धार्थ कसारे, सचिन पाचपुंजे, राहुल कांबळे, सुदाम तुपसमिंदर, रवी खंदारे, सुशील शिंदे, परमेश्वर कांबळे, रवी मानवतकर आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत पाच ठराव मंजूर करण्यात आले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोनाच्या अटी व शर्तींसह साजरी करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास १४ एप्रिल रोजी अभिवादन करण्यासाठी सकाळी ८ वाजता फिजिकल डिस्टन्सचे पालन करून सामूहिक मानवंदना घेण्यात येईल, सकाळी ९ वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावरून दुचाकी रॅली काढण्यात येईल. मर्यादित स्वरुपाचे वाद्य लावून मिरवणूक काढण्यात येईल. कोरोना संदर्भात जनतेला संदेश देण्याबाबत पथनाट्य व देखावे तयार करण्यात येतील. हे ठराव मंजूर करण्यात आले.

बैठकीत २१ जणांची मुख्य समिती स्थापन करण्यात आली. आशिष वाकोडे यांनी प्रास्ताविक केले. राहुल वहिवाळ यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Bhim Jayanti will be celebrated with pomp and ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.