सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी भजन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:51+5:302021-07-16T04:13:51+5:30

शहरातील जनकल्याण नागरी सहकारी बँकेच्या सभागृहात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व वारकरी संप्रदायाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात ...

Bhajan agitation on Saturday to draw the attention of the government | सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी भजन आंदोलन

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी भजन आंदोलन

शहरातील जनकल्याण नागरी सहकारी बँकेच्या सभागृहात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व वारकरी संप्रदायाच्या वतीने गुरुवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेस बालासाहेब महाराज कटारे, प्रभू महाराज मोरे, त्र्यंबक महाराज दस्तापुरकर, गोविंद महाराज पोंढे, सुरेंद्र शहाणे, शिवप्रसाद कोरे, प्रल्हाद कानडे, गोपाळ रोडे, श्रीपाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. राज्य शासनाने वारकऱ्यांच्या पालखी संदर्भात व वारकऱ्यांना दिलेल्या वागणुकीचा निषेध यावेळी मान्यवरांनी केला. अनंत पांडे म्हणाले, पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या सात पालख्यांसोबत काही ठरावीक वारकऱ्यांना दिंडी करू द्यावी, ज्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहे, त्यांनाच जाण्यासाठी परवानगी द्यावी. यासह सर्व नियम पाळून केलेल्या मागण्यांचा शासनाने विचार न केल्याने या सरकारला जागे करण्यासाठी शनिवारी देवगिरी प्रांतात सर्वच तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करणार असल्याचे सर्व वक्त्यांनी सांंगितले. यानंतरही मागण्या मान्य झाल्यास २० जुलै रोजी सर्वच गावांमध्ये आषाढी एकादशीला सर्वच मंदिराभोवती नगर प्रदक्षिणा कार्यक्रम घेतला जाणार आहे.

Web Title: Bhajan agitation on Saturday to draw the attention of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.