लाभार्थ्यांना मिळेना तूर डाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:20 IST2021-02-25T04:20:37+5:302021-02-25T04:20:37+5:30
परभणी : जिंतूर रस्त्याच्या एका बाजुचे काम जवळपास पूर्ण होत आले असून, दुसऱ्या बाजुने सिमेंट काँक्रेटीकरण केले जात आहे. ...

लाभार्थ्यांना मिळेना तूर डाळ
परभणी : जिंतूर रस्त्याच्या एका बाजुचे काम जवळपास पूर्ण होत आले असून, दुसऱ्या बाजुने सिमेंट काँक्रेटीकरण केले जात आहे. मात्र या रस्त्यावरील पुलांची कामे सध्या ठप्प आहेत. त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील पुलांची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी वाहनधाकांतून होत आहे.
जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री
परभणी : राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही जिल्ह्यात मात्र गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलीस प्रशासनाने मागील सहा महिन्यांपासून गुटखा विक्रीविरुद्ध मोहीम सुरू केली होती. त्या काळात ही विक्री बंद झाली असली तरी मोहीम थंड झाल्यानंतर गुटख विक्री वाढली आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
माेबाईलधारक त्रस्त
परभणी : जिल्ह्यात नागरिकांच्या मोबाईलवर पैशाचे आमिष दखविणारे संदेश मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. शिवाय अनोळखी फोनही येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. ग्राहकांच्या एटीएम कार्डवरील नंबर व व्हीपीएन काेडनंबर मागवून घेवून त्यांच्या खात्यातून ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे काढणाऱ्यांची टोळी सध्या सक्रिय झाली आहे.
खड्डे बनले धोकादायक
देवगाव फाटा: सेलू ते वालूर रस्त्याच्या कडेला केबल अंथरण्यासाठी केलेले खड्डे वाहनधारकांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. या रस्त्यावर एका खाजगी मोबाईल कंपनीकडून केबल अंथरण्यासाठी मोठ -मोठे खड्डे करण्यात आले. या मध्ये बैल पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. त्याच सोबतच एक मेंढपाळ, पत्नी व तीन मुलांसह बैलगाडी या खड्डयात गेल्याने जखमी झाले होते.
अवजड वाहनांमुळे ग्रामस्थ त्रस्त
बोरी :जिंंतूर तालुक्यातील बोरी ते कौसडी या रस्तयावर क्षमतेपेक्षा अधिक खडी घेवू अवजड वाहने धावत असल्याने अपघाताच्या भितीने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून या रस्तयावर अवजड वाहनांची रेलचेल वाढली आहे. अशातच ही वाहने भरधाव वेगाने जात असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.