परभणीत बीएड सीईटीत ऐनवेळी शॉर्ट सर्किटने संगणक बंद; असुविधेने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By राजन मगरुळकर | Updated: March 27, 2026 13:26 IST2026-03-27T13:23:07+5:302026-03-27T13:26:05+5:30

संगणकांची पूर्वतपासणी नाही अन् आसनव्यवस्थाही तोकडी; विद्यार्थी आक्रमक

B.Ed CET Chaos in Parbhani: Short Circuit Halts Exam at MGM College Center; 1,300 Students Affected | परभणीत बीएड सीईटीत ऐनवेळी शॉर्ट सर्किटने संगणक बंद; असुविधेने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

परभणीत बीएड सीईटीत ऐनवेळी शॉर्ट सर्किटने संगणक बंद; असुविधेने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

परभणी: शहरातील एमआयडीसी भागातील एमजीएम महाविद्यालय येथील MAH-B.Ed CET-2026 परीक्षा केंद्रावर शुक्रवारी (दि. २७ मार्च) सकाळपासून प्रचंड गोंधळ उडाला आहे. या केंद्रावर संगणकांची पूर्वतपासणी न केल्याने आणि अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे अनेक संगणक बंद पडल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. परिणामी, परीक्षेसाठी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शॉर्टसर्किट आणि अपुरी आसनव्यवस्था
परभणी शहरातील या एकमेव केंद्रावर दिवसभरात तीन ते चार सत्रांमध्ये सुमारे १३०० विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी बोलावण्यात आले आहे. पहिल्या सत्रातील २९० विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळी ११ वाजता सुरू होणार होती. मात्र, संगणक प्रणालीची तांत्रिक तपासणी न झाल्याने आणि वीजपुरवठ्यात बिघाड झाल्याने परीक्षेचा बोजवारा उडाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. सकाळी १० वाजेपासून केंद्रावर हजर असूनही त्यांना परीक्षेसाठी आत प्रवेश मिळण्यास अडचणी येत असल्याचे विद्यार्थी आणि महिला परीक्षार्थी यांनी सांगितले.

विविध संघटनांची मध्यस्थी
परीक्षेतील या गैरसोयीची माहिती मिळताच प्राध्यापक विठ्ठल कांगणे, नितीन देशमुख यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रावर धाव घेतली. त्यांनी विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासनाशी संवाद साधून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला असून, सीईटी सेलने या गोंधळाची जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

Web Title : परभणी बीएड सीईटी शॉर्ट सर्किट से बाधित, छात्र फंसे।

Web Summary : परभणी में शॉर्ट सर्किट से बीएड सीईटी परीक्षा बाधित, सैकड़ों छात्र फंसे। तकनीकी खराबी और बिजली कटौती से परीक्षा केंद्र में देरी और निराशा हुई। विभिन्न संगठनों ने हस्तक्षेप कर सीईटी सेल से जवाबदेही की मांग की।

Web Title : Parbhani B.Ed CET Disrupted by Short Circuit, Students Stranded.

Web Summary : A short circuit disrupted the B.Ed CET exam in Parbhani, leaving hundreds of students stranded. Technical issues and power outages plagued the exam center, causing delays and frustration. Various organizations intervened, demanding accountability from CET cell.