शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

एका फाइलसाठी ५ ते २० हजार रुपये लाच घेणाऱ्या बीडीओने दिली तब्बल १०३५ विहिरींना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:45 IST

सिंचन विहिरी आणि जनावरांच्या गोठ्यांमध्ये अडवणुकीतून मोठी उलाढाल

- विठ्ठल भिसेपाथरी : सिंचन विहिरीच्या मंजुरीसाठी ३५ हजारांची लाच स्वीकारताना गटविकास अधिकारी ईश्वर पवार यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून अटक झाल्यानंतर पाथरीच्या मनरेगा विभागाच्या सुरसकथा समोर येऊ लागल्या आहेत. त्यांच्या काळातच तब्बल १०३५ विहिरींना मनरेगातून मंजुरी दिली असून पाच ते २० हजारांपर्यंत दर होता. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत सार्वजनिक आणि वैयक्तिक कामाच्या प्रशासकीय मान्यतेपासून कार्यारंभ आदेशापर्यंत पंचायत समितीत कर्मचाऱ्यांची एक साखळी तयार झाली होती. ग्रामपंचायतकडून प्रस्ताव दाखल झाल्यानंतर कामाचे अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता आणि पुढे कार्यारंभ आदेशापर्यंतची ही माळ होती, तर मस्टर काढण्यापासून मस्टर एमआयसपर्यंतचे वेगळे दर ठरलेले असायचे. ही प्रक्रिया पार पाडल्याशिवाय कोणतेही काम सोयीस्करपणे पुढे जात नव्हते. पाथरीच्या मनरेगा विभागाने अक्षरश: बाजार मांडला होता. एका सिंचन विहिरीला पाच लाख मिळू लागल्याने मंजुरीचे दर पाच हजारांहून वीस हजारांपर्यंत पोहोचले होते.

विकास अधिकारी ईश्वर पवार हे ऑक्टोबर २०२३ मध्ये पाथरी पंचायत समितीला रुजू झाले. त्यानंतर मनरेगात तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने दलालांची साखळी अस्तित्वात आली. आपल्या मालकी हक्कातून कामांना मंजुरी देत आहोत अशाप्रकारे शेतकऱ्यांची लयलूट सुरू होती. मनरेगामध्ये अगोदरच शेतकऱ्यांना केलेल्या कामाची कुशल आणि अकुशल देयके मिळत नाहीत. मंजुरी प्रक्रियेला लागणारा टेबलाखालील खर्च परवडत नसल्याने गटविकास अधिकाऱ्यांचीच तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष देतील का?जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर या कर्तव्यकठोर अधिकारी आहेत. त्यांनी अनेक विभागांची झाडाझडती घेतली. विविध बाबतीत शिस्त लावली. कारवाईचा बडगाही उगरला. मनरेगातही त्यांनी काही बाबींत लक्ष घातले आहे. मात्र, मंजुरीच्या नावाखाली मांडला गेलेला बाजार त्यांच्या नजरेत येणे शक्य नाही. मात्र, आता त्यांनी यावर फोकस केला तर ग्रामीण जनतेला वैयक्तिक लाभाच्या योजनांत गोरगरीब शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागparabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरी