शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

बँकेचे शटर उघडले, कॅमेरे तोडले; सुदैवाने तिजोरीच न फुटल्याने लाखो रुपये वाचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 1:31 PM

परभणी जिल्हा बॅकेच्या शहर शाखेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न फसला 

ठळक मुद्देचोरट्यांनी शाखेतील चार सीसीटीव्ही कॅमेरे तोडलेएक कॅमेरा आणि संगणकाची हार्ड डिस्क लांबवली आहे.

सेलू  ( परभणी ) :  सेलू - पाथरी रस्त्यावरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शहर शाखेत दरोड्याचा प्रयत्न फसल्याचे शुकवारी सकाळी उघडकीस आले. गुरूवारी मध्यरात्री चोरट्यांनी बँकेचे शटर वाकून आत प्रवेश केला. सुदैवाने मजबूत तिजोरी त्यांना फोडता आली नाही. यामुळे त्यातील २ लाख ८० हजार ४१९ एवढी रक्कम सुरक्षित राहिली आहे.

बाजारसमितीच्या यार्डात परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शहर शाखा आहे. गुरूवारी मध्यरात्री रात्री चोरट्यांनी बँकेचे शटर वाकून आतमध्ये प्रवेश केला. तिजोरी असलेल्या खोलीत जाऊन कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तिजोरी मजबूत असल्याने चोरट्याने ती फोडण्यात अपयश आले. यामुळे त्यातील  २ लाख ८० हजार ४१९ एवढी रक्कम सुरक्षित राहिली. चोरट्यांनी शाखेतील चार सीसीटीव्ही कॅमेरे तोडून त्यातील एक कॅमेरा आणि संगणकाची हार्ड डिस्क लांबवली आहे. 

शुक्रवारी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर आलेल्या काही नागरिकांना  बॅकेचे शटर वाकलेले दिसले. त्यांनी ही माहिती मुख्य शाखेचे शाखाधिकारी एस. जी. मगर यांना सांगितली. त्यानंतर शाखाधिकारी मगर, बॅंक कर्मचारी कृष्णा रोडगे यांनी  बँकेत धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीRobberyचोरीtheftचोरी