शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

बळीराजाचे श्रम होणार कमी; बैल, ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र झाले विकसित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:31 IST

एकाला १४ नोझल तर दुसऱ्या यंत्राला १६ नोझल बसविण्यात आले. 

ठळक मुद्देआधुनिक बीबीएफ यंत्र विकसित आतापर्यंत १२५ एकर क्षेत्रांवर पेरणी कृषी 

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरचलित, तसेच बैलचलित सौर ऊर्जेवर चालणारे फवारणी यंत्र विकसित केले. परभणी तालुक्यातील जांब येथे शनिवारी या यंत्राचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले़ 

१४, १६ नोझलमध्ये तयार केले यंत्रबीबीएफ यंत्राचाच एक भाग असलेल्या ट्रॅक्टर चलित फवारणी  यंत्राची माहिती व प्रात्यक्षिक डॉ़ स्मिता सोलंकी यांनी करून दाखविले़ शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या ट्रॅक्टरचा पूर्ण क्षमतेने वापर होत नाही़ ट्रॅक्टरच्या टायरची जाडी जास्त असल्याने ते फवारणीसाठी वापरले जात नाही़ त्यामुळे कृषी विद्यापीठाने स्लिम टायर वापरून फवारणी यंत्र तयार केले आहे़ ट्रॅक्टरवरून चालणारे हे यंत्र दोन पद्धतीत उपलब्ध आहे़ एकाला १४ नोझल तर दुसऱ्या यंत्राला १६ नोझल बसविण्यात आले. 

सोयाबीन व इतर पिकांमध्ये हे ट्रॅक्टर चलित फवारणी यंत्र चांगले काम करते़ उभ्या पिकामध्ये या यंत्राच्या सहाय्याने कोळपणी आणि फवारणी करणे शक्य आहे़ त्याचबरोबर बैलचलित फवारणी यंत्रही विद्यापीठाने विकसित केले. हे यंत्र सौर उर्जेवर चालते़ त्यामुळे इंधनाची बचत होते, असे कृषी विद्यापीठातील डॉ़ स्मिता सोलंकी यांनी या सांगितले. या प्रसंगी कुलगुरु अशोक ढवण, विस्तार शिक्षण संचालक डॉ़ देवराव देवसरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, प्राचार्य डॉ़ उदय खोडके, संशोधन अभियंता डॉ़ स्मिता सोलंकी, उपविभागीय अधिकारी सागर खटकाळे, जि़प़ सदस्य बाळासाहेब रेंगे,  महेश शेळके, राम गमे, रामकृष्ण रेंगे यांची उपस्थिती होती़ 

ट्रॅक्टरवर आधारित यंत्रकृषी विद्यापीठाने बीबीएफ हे यंत्र तयार केले आहे़ या यंत्राच्या साहाय्याने पेरणी, रासणी, कोळपणी, तणनाशक व कीटकनाशक फवारणी आदी कामे केली जाऊ शकतात़ ट्रॅक्टरवर आधारित हे यंत्र आहे़ सध्या फवारणीचे दिवस असल्याने विद्यापीठानेच विकसित केलेल्या ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र आणि बैलचलित सौरफवारणी यंत्र अशा दोन यंत्रांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले़ 

शेतकऱ्याची गरज ओळखून केले यंत्र विकसितमराठवाड्यातील शेती प्रामुख्याने कोरडवाहू असून, सोयाबीन लागवडीचे क्षेत्र वाढत आहे़ कोरडवाहू शेती पिकांचे उत्पादन पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते़ ही गरज ओळखून कृषी विद्यापीठाने बीबीएफ हे यंत्र विकसित केले आहे़ या यंत्राच्या साहाय्याने आतापर्यंत १२५ एकर क्षेत्रावर पेरणी केल्याचे कुलगुरू डॉ़ अशोक ढवण यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ