बहुजन क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:20 IST2018-10-24T00:19:32+5:302018-10-24T00:20:47+5:30
अहमदाबाद येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या परिवर्तन यात्रेतील कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करुन राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले.

बहुजन क्रांती मोर्चाचे धरणे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अहमदाबाद येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या परिवर्तन यात्रेतील कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करुन राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने परभणीत धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा कचेरीसमोर सकाळी ११ वाजेपासून बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनास प्रारंभ केला. बहुजन क्रांती मोर्चाद्वारे एस़सी़, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांविषयी जनजागृती केली जाते. या अंतर्गत देशभरात परिवर्तन यात्रा काढण्यात आल्या. २२ आॅक्टोबर रोजी अहमदाबाद येथे या यात्रेचा समारोपीय कार्यक्रम आयोजित केला होता. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला. त्यात अनेक कायकर्ते जखमी झाले. राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांना अटक केली होती. याच्या निषेधार्थ परभणीत हे धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा संयोजक लखन चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.