सेलू ते निपाणी टाकळी रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:19 IST2021-02-09T04:19:30+5:302021-02-09T04:19:30+5:30
सेलू : उपजिल्हा रुग्णालय मार्ग असलेल्या सेलू ते निपाणी टाकळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प ...

सेलू ते निपाणी टाकळी रस्त्याची दुरवस्था
सेलू : उपजिल्हा रुग्णालय मार्ग असलेल्या सेलू ते निपाणी टाकळी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
सेलू ते निपाणी टाकळी हा ३ किलोमीटरचा रस्ता जिल्हा परिषदेकडे आहे. काही वर्षांपूर्वी परभणीला जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जात होता. मात्र, रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने ३ किलोमीटरचा असलेला हा मार्ग अधिक सुकर असतानाही नाईलाजाने ८ किलोमीटरचा वळसा घालून अन्य मार्गाने सेलूकरांना प्रवास करावा लागत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे ३ किलोमीटर असलेल्या या मार्गावरील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात गंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी नेण्यासाठी सेलू शहराला वळसा घालून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत परभणी गाठावी लागते. विनाकारण ८ किलोमीटरच्या अन्य मार्गाने जावे लागते. यामुळे अनेकदा रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तीन किलोमीटरच्या या मार्गाचे निम्मे काम पूर्ण झाले असून, केवळ १.५ किलोमीटर रस्त्याचे काम रखडले आहे. या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.