बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:18 IST2021-02-24T04:18:48+5:302021-02-24T04:18:48+5:30

खंडाळी: गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी १९फेब्रुवारी रोजी ११ ते १ ...

Babajani Durrani felicitated | बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार

बाबाजानी दुर्राणी यांचा सत्कार

खंडाळी: गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी १९फेब्रुवारी रोजी ११ ते १ या वेळेत विजयानंद महाराज सुपेकर यांचे कीर्तन झाले. यावेळी ह.भ.प. सुदाम महाराज भोसले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अवकाळी पावसाने नुकसान

खंडाळी: गंगाखेड तालुक्यातील खंडाळी व परिसरात शुक्रवारी झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या ज्वारी, गहू व हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी काही गहू व ज्वारीची कापणी केली होती. त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करुन मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

खंडाळी येथे शीलपूजन कार्यक्रम

खंडाळी: गंगाखेड तालुक्यातील खंडाळी येथे श्री संत मोतीराम महाराज मंदिराच्या शीला पूजन कार्यक्रम १९फेब्रुवारी रोजी आजोजित करण्यात आला होता. ह.भ.प. विजयानंद महाराज सुपेकर यांच्या हस्ते शीलापूजन झाले. यावेळी ह.भ.प. सुदाम महाराज खंडाळीकर, विक्रम महाराज खंडाळीकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डांबरीकरण करण्याची मागणी

खंडाळी: गंगाखेड तालुक्यातील पिंपळदरी फाटा ते राणीसावरगाव या ९कि.मी.अंतराच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून वाहने चालवितांना वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे हा रस्ता परभणी आणि लातूर या दोन जिल्ह्याला जोडणारा आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

वालूर: सेलू तालुक्याातील वालूर येथील श्रीमती शांताबाई नखाते आश्रम शाळेत मंगळवारी संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य आर.व्ही.नखाते, जी.पी. केंद्रे, एच.आर.होनराव, ए.एम.सुरवसे, भगवान पल्लेवाड, सुरेश नखाते, सुमेध आवटे, बी.बी. नखाते, महादू गायकवाड यांची उपस्थिती होती.

लिंबा येथे प्रबोधनपर कार्यक्रम

लिंबा: पाथरी तालुक्यातील लिंबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाहीर भारत मुंजे यांच्या प्रबोधनपरकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी विक्रम टोंपे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विष्णू चव्हाण, बाबासाहेब कदम, अनिरुद्ध महाजन, बी.एल. दळवे, अशोकराव दुगाणे, बाबुराव दळवे, पाराजी इदगे, राजेभाऊ नवघरे, भागवत खळे, किशन कुकडे, बालासाहेब सहजराव यांची उपस्थिती होती.

Web Title: Babajani Durrani felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.