शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुळी बंधारा कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मुळी येथे उभारलेल्या निम्न पातळी बंधाऱ्याला प्रायोगिक तत्त्वावर बसवलेले स्वयंचलित दरवाजे निकामी झाले ...

गंगाखेड : तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मुळी येथे उभारलेल्या निम्न पातळी बंधाऱ्याला प्रायोगिक तत्त्वावर बसवलेले स्वयंचलित दरवाजे निकामी झाले आहेत. त्यानंतर या बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्याच्या कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये निर्माण होत असलेल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी व नदीकाठच्या गावांमधील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी २०११मध्ये मुळी येथे नदीपात्रात निम्न पातळीचा बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याला प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आलेले स्वयंचलित दरवाजे २०१२ व २०१६ असे दोनवेळा क्षतीग्रस्त झाल्याने या बंधाऱ्यात येणारे पाणी तसेच पुढे वाहून जात आहे. मुळी बंधाऱ्यात पाणी साठवण होत नसल्याने कोट्यवधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेला मुळी बंधारा शोभेचे बाहुला ठरत आहे. या बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, अशी मागणी करत तालुक्यातील शेतकरी तसेच नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. यामुळे मुळी येथील गोदावरी नदीपात्रात असलेल्या मुळी बंधाऱ्याला उचल पध्द्तीचे दरवाजे बसविण्याच्या कामासाठी शासनाने १५ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली. सद्यस्थितीत या बंधाऱ्याच्या दरवाज्यांच्या कामाचे तांत्रिक अंदाजपत्रक नांदेड येथील पाटबंधारे विभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत असून, त्याला मंजुरी मिळताच या कामाची निविदा काढून दरवाजे बसविण्याच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे.

गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्यात पाणी साठवण सुरु झाल्यास गंगाखेड शहरासह सोनपेठ तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासह सुमारे १,७०५ हेक्टरपेक्षा अधिक शेत जमिनीवरील सिंचनाचा प्रश्नही सुटणार आहे.

जनता दरबारात उपस्थित केला प्रश्न

गंगाखेड तालुक्यातील शेतीचे अर्थचक्र, पिण्यासाठी पाणी आणि दुष्काळ निवारणासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या मुळी बंधाऱ्याच्या दरवाजांच्या कामासाठी प्राधान्यक्रमाने निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, अशी मागणी गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारावेळी दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर ओंकार पवार, दादासाहेब पवार, दीपक वैरागर, सखाराम पवार, गोविंद जाधव, नामदेव पसार, सुधीर खळीकर, दीपक पवार, चांगदेव सोन्नर, मंचक पवार, संतोष गौरशेटे, विजय बेद्रे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.