गंगाखेड येथे विवाह सोहळ्यात मारहाण; एक महिला गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 21:11 IST2018-06-18T21:11:19+5:302018-06-18T21:11:19+5:30
विवाह सोहळ्यात झालेल्या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास मरडसगाव येथे घडली.

गंगाखेड येथे विवाह सोहळ्यात मारहाण; एक महिला गंभीर जखमी
गंगाखेड (परभणी ) : विवाह सोहळ्यात झालेल्या मारहाणीत एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास मरडसगाव येथे घडली.
गंगाखेड तालुक्यातील मरडसगाव येथील मठात सोमवार रोजी दोन लग्न सोहळे होते. त्यापैकी एक विवाह सोहळा झाल्यानंतर दुपारी २:३० वाजता वधु काजल तानाजी शिंदे व वर विजय गंगाराम बाबर यांचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. दुपारी ३ वाजता हा विवाह सोहळा झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळी जेवण करीत असताना वधुची आत्या जयाबाई माणिकराव शिंदे (वय ३८ वर्ष रा. मरडसगाव ) यांचा काही जणांसोबत वाद झाला. वाद झालेले पाहुणे बाहेर गावची असल्याने वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. मारहाणीत जयाबाई यांच्या डोक्याला जबर मार लागला. डोक्याला गंभीर मार लागलेला असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.