थकबाकी ४५४ कोटी; वसुली १० कोटींची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:18 AM2020-12-06T04:18:01+5:302020-12-06T04:18:01+5:30

परभणी: जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या ३ लाख ३७ हजार ६४ ग्राहकांकडे ४ डिसेंबरपर्यंत ४५३ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी ...

Arrears of Rs 454 crore; Recovery of 10 crores | थकबाकी ४५४ कोटी; वसुली १० कोटींची

थकबाकी ४५४ कोटी; वसुली १० कोटींची

Next

परभणी: जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीच्या ३ लाख ३७ हजार ६४ ग्राहकांकडे ४ डिसेंबरपर्यंत ४५३ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी असून नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील ४५ हजार १७९ वीज ग्राहकांनी केवळ १० कोटी ३८ लाख रुपयांचा वीज बिल भरणा केला आहे. त्यामुळे महावितरणकडून वीज वसुलीसाठी एक गाव एक दिवस मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना घरोघर फिरुन प्रत्यक्ष रिडिंग घेता आली नाही. त्यामुळे सरासरीवर आधारित बिले देण्यात आली. विशेष म्हणजे या काळात ग्राहकांनीही वीज बिले भरली नाहीत. त्यातच राज्यस्तरावर वाढीव बिले माफ करण्याची सवलत द्यावी, अशी मागणी होत होती. त्यामुळे आपले वीज बिल माफ होईल, या आशेवर ग्राहकांनीही देयके भरण्यास आखडता हात घेतला. त्यामुळे ४ डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ३७ हजार ६४ ग्राहकांकडे ४५३ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी झाली. यामध्ये घरगुती,वाणिज्य, औद्योगिक, कृषी, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा, सार्वजनिक सेवा आदींचा समावेश आहे. कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीनेही वीज ग्राहकांकडे बिल भरण्याबाबत तगादा लावला नाही. त्यामुळे परभणी विभाग क्रमांक १ कडे १५१ कोटी ६३ लाख व परभणी विभाग क्रमांक २ कटे १७० कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. अनलॉक सुरु झाल्यानंतर वीज कंपनीने ग्राहकांना दिलेली बिले तत्काळ भरावीत, असे आवाहन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील वीज बिल भरणा केंद्रावर जाऊन २४ हजार ९६२ ग्राहकांनी ५ कोटी ८६ लाख रुपयांचा बिल भरणा केला आहे. तसेच विविध पर्यांयांचा वापर करत घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने २० हजार २१७ ग्राहकांनी ४ कोटी ५२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात ४५ हजार १७९ वीज ग्राहकांनी केवळ १० कोटी ३८ लाख रुपयांचा वीज बिल भरणा केला आहे. त्यामुळे जिल्ह्याची थकबाकी ४५४ कोटी रुपये असताना अनलॉक झाल्यानंतरही ४५ हजार ग्राहकांकडून केवळ १० कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यात वीज बिल वसुलीसाठी १ गाव एक दिवस मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत वीज बिलांबाबत ग्राहकांचे समाधान केले जात आहे.

केवळ २२.३२ टक्के वसुली

वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना देण्यात आलेल्या बिलापोटी नोव्हेंबर महिन्यात १० कोटी ३८ लाख रुपयांचा भरणा ४५ हजार १७९ ग्राहकांनी केला आहे. त्यामुळे वीज बिल भरणा करण्याची टक्केवारी केवळ २२.३२ आहे. महावितरणला ग्राहकांना वीज सेवा देताना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Arrears of Rs 454 crore; Recovery of 10 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.