१४५ उमेदवारांचे अर्ज अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:15 IST2021-01-02T04:15:02+5:302021-01-02T04:15:02+5:30
परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत दाखल १३ हजार ६३ अर्जांपैकी १४५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याची माहिती ...

१४५ उमेदवारांचे अर्ज अवैध
परभणी : जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत दाखल १३ हजार ६३ अर्जांपैकी १४५ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली. जिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्या अनुषंगाने १३ हजार ६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. या अर्जांची गुरुवारी छाननी करण्यात आली. त्यामध्ये परभणी तालुक्यातील १६, सेलू तालुक्यातील १२, जिंतूरमधील १४, पाथरीतील ५, मानवत तालुक्यातील १६, सोनपेठ तालुक्यातील १०, गंगाखेड तालुक्यातील २४, पालममधील २६ असे एकूण १४५ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. एकूण १२ हजार ७३३ उमेदवारांचे १२ हजार ८०७ अर्ज वैध ठरले आहेत. आता ४ जानेवारीपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज परत घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट होणार आहे.