परभणी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी अंबादास भोसले बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:29 IST2018-09-11T18:28:30+5:302018-09-11T18:29:01+5:30

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी अंबादास तुकाराम भोसले यांची बिनविरोध निवड झाली

Ambadas Bhosale unanimously elected as Deputy Chairman of Parbhani District Bank | परभणी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी अंबादास भोसले बिनविरोध

परभणी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदी अंबादास भोसले बिनविरोध

परभणी-परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी अंबादास तुकाराम भोसले यांची बिनविरोध निवड झाली असून त्यांच्या निवडीने हिंगोली जिल्ह्याला उपाध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक १५ मे रोजी पार पडली होती. यावेळी बँकेचे तत्कालीन उपाध्यक्ष पंडितराव चोखट यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने उपाध्यक्षपद रिक्त झाले होते. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बँकेच्या सभागृहात उपाध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळांची विशेष सभा घेण्यात आली.  उपाध्यक्षपदासाठी अंबादास तुकाराम भोसले यांचेच दोन अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी हे नामनिर्देशनपत्र वैध ठरविले. एकमेव अर्ज आल्याने अंबादास भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी जाहीर केले.
 

Web Title: Ambadas Bhosale unanimously elected as Deputy Chairman of Parbhani District Bank