सरसकट बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:17 IST2021-04-08T04:17:44+5:302021-04-08T04:17:44+5:30
जिंतूर : शहरातील संपूर्ण बाजारपेठ कोरोनाविषयक नियम व अटींचे निर्बंध लावून उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी तालुका व्यापारी महासंघाच्या ...

सरसकट बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्या
जिंतूर : शहरातील संपूर्ण बाजारपेठ कोरोनाविषयक नियम व अटींचे निर्बंध लावून उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी तालुका व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच आ. मेघना बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर आदींनी बुधवारी केली.
यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३० एप्रिलपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बहुतांश दुकानदारांची दुकाने ही किरायाच्या जागेत आहेत. त्यामुळे त्यांना दुकानभाडे, नोकरांचे पगार, लाईट बिल, बँकेचे हप्ते देणे-घेणे, कुटुंबाचा खर्च भागवावा लागतो, यासाठी दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, अन्यथा ९ एप्रिल रोजी लोकशाही मार्गाने आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनावर तालुकाध्यक्ष रमेश दरगड, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, गणेश कुऱ्हे, संतोष देशमुख, प्रदीप कोकडवार, बाबा खान, फारुख मिर्झा आदींची नावे आहेत. आ. मेघना बोर्डीकर यांनीही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.