पीकविम्यासाठी रिलायन्स विमा कंपनीच्या २ जिल्हा प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 06:57 PM2021-12-01T18:57:48+5:302021-12-01T18:58:18+5:30

कंपनीचे मुख्य समन्वयक प्रकाश थॉमस यांनी दिलेल्या २७८ कोटींच्या वितरणाच्या आश्वासनावर सुटका

aggression for crop insurance, 2 district representatives of Reliance Crop Insurance Company were locked by Farmers | पीकविम्यासाठी रिलायन्स विमा कंपनीच्या २ जिल्हा प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी डांबले

पीकविम्यासाठी रिलायन्स विमा कंपनीच्या २ जिल्हा प्रतिनिधींना शेतकऱ्यांनी डांबले

Next

परभणी: यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही पिक विमा देण्यास टाळाटाळ केल्याच्या कारणावरून रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या जालना व परभणी येथील जिल्हा प्रतिनिधींना ३० नोव्हेंबरच्या रात्री शेतकरी संघटना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परभणी तालुक्यातील आर्वी येथे डांबून ठेवले. कंपनीचे मुख्य समन्वयक प्रकाश थॉमस यांनी अग्रीम व नुकसानीच्या मोबदल्यापोटी २७८ कोटींची मदत देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा या दोन्ही प्रतिनिधींना सोडून देण्यात आले.

या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील तीन लाखहून अधिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी विभाग व विमा कंपनीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून मदतीसाठीचा अहवाल विमा कंपनीच्या मुख्य कार्याुलयाकडे पाठविला. मात्र विमा कंपनीने वेगवेगळी कारणे देत विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कृषी विभागाने विमा कंपनीच्या दोन राज्य समन्वयकांविरुद्ध परभणीत गुन्हे दाखल केले. त्यानंतरही शेतकऱ्यांना मदतीबाबत विमा कंपनीकडून कोणत्याच हालचाली होताना दिसून आल्या नाही. त्यामुळे शेतकरी संघटना व भाजपाच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आक्षेप घेतलेल्या पीक कापणी प्रयोगावर सुनावणीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीस रिलायन्स विमा कंपनीचे परभणीचे जिल्हा प्रतिनिधी शिंदे व जालना येथील जिल्हा प्रतिनिधी अवधूत शिंदे उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर हे दोन्ही प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर सायंकाळी ६.३० च्या सुमारास शेतकरी संघटना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन आर्वी येथे नेले. तेथे त्यांना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम यांच्या घरात डांबून ठेवले. रात्री ८.३०च्या सुमारास डांबून ठेवलेल्या प्रतिनिधींनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी फोनवर पिक विम्याबाबत आश्वासन दिले; परंतु जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप २०२० व रब्बी २०२० चे ५६ कोटी व यावर्षीच्या खरीप हंगाम- २०२१ तक्रारींचे ३२५ कोटी आणि अग्रीम रक्कम जोपर्यंत मंजूर करण्यात येत नाही, तोपर्यंत या प्रतिनिधींना सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानंतर विमा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश थॉमस यांनी कार्यकर्त्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या सदस्यांच्या अटी मान्य करून २६८ कोटी रुपयांची मदत १ डिसेंबरपासून शेतकऱ्यांना देण्याचे त्यांनी मान्य केले. थॉमस यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर दोन्ही प्रतिनिधींना मध्यरात्री १.३० च्या सुमारास परभणीत आणून सोडण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विश्वभर गोरवे, राजू देशमुख, अनंत कदम, अशोक कदम यांच्यासह पेडगाव, शहापूर, टाकळी कुंभकर्ण, आर्वी येथील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: aggression for crop insurance, 2 district representatives of Reliance Crop Insurance Company were locked by Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.