जिल्ह्यात दीड हजार मतदारांचे वय वर्ष १००
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:04 IST2021-02-05T06:04:10+5:302021-02-05T06:04:10+5:30
२२ हजार नव मतदार प्रत्येक मतदार यादीत नवीन मतदारांना नोंदणीसाठी उदयुक्त केले जाते. निवडणुकांमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या ...

जिल्ह्यात दीड हजार मतदारांचे वय वर्ष १००
२२ हजार नव मतदार
प्रत्येक मतदार यादीत नवीन मतदारांना नोंदणीसाठी उदयुक्त केले जाते. निवडणुकांमध्ये प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या मतदारांच्या माध्यमातून देशाचा, राज्याचा प्रतिनिधी निवडला जातो. या मतदारांची विचारसरणी, बदलेल्या समस्या आणि काम करण्याची पद्धत या बाबींमध्येही राज्यकर्त्यांना वेळोवेळी बदल करणे क्रमप्राप्त ठरते. जिल्ह्यात यावेळेच्या मतदार यादीत २१ हजार ९७० नव मतदारांचा समावेश झाला आहे. १८ ते१९ वर्षे वयोगटातील हे मतदार असून, गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ७ हजार १६२ नवमतदारांचा समावेश झाला आहे. तर जिंतूर विधानसभा मतदार संघात ५ हजार ४३६, परभणी ४ हजार १४२ आणि पाथरी विधानसभा मतदार संघात ५ हजार २३० नवमतदार आहेत.
मतदारसंघ निहाय शंभरीपार मतदार
परभणी १९३
जिंतूर ४१३
गंगाखेड ५४०
पाथरी ३८९