६ तासांच्या अथक प्रयत्नांना यश, बोअरवेलमध्ये पडलेला गोलू सुखरूप बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 19:45 IST2023-08-09T19:44:21+5:302023-08-09T19:45:06+5:30
उक्कलगाव शिवारातील शेतात खुरपणीसाठी आजी ४ वर्षांच्या नातवासोबत आल्या होत्या.

६ तासांच्या अथक प्रयत्नांना यश, बोअरवेलमध्ये पडलेला गोलू सुखरूप बाहेर
मानवत: उक्कलगाव शिवारात खेळताखेळता बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्यास सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. आजीसोबत शेतात आलेला चिमुकला गोलू सुरेश पिंपळे आज दुपारी बोअरवेलमध्ये पडला होता.
उक्कलगाव शिवारातील शेतात खुरपणीसाठी आजी ४ वर्षांच्या नातवासोबत आल्या होत्या. सर्वजण कामात व्यस्त असताना चिमुकला शेतातील बोअरवेलमध्ये पडला. माहिती मिळताच घटनास्थळी महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाचे पथक दाखल झाले. चिमुकला खड्ड्यात १० ते १५ फुट आत असल्याचा अंदाज घेऊन पथकाने बचाव कार्य सुरु केले. जेसीबीच्या सहाय्याने बोअरवेलच्या बाजूस समांतर दुसरा खड्डा करण्यात आला. त्यानंतर गोलुला बाहेर काढण्यात यश आले. गोलूची प्रकृती ठीक असून त्याला नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गोलू सुखरूप असल्याने नातेवाईकांसह प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.