आदिलाबाद-पूूर्णा (परभणी) रेल्वे डब्ब्याचा दरवाजा तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:51 IST2018-04-14T00:51:40+5:302018-04-14T00:51:40+5:30

दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या आदिलाबाद-पूर्णा रेल्वे गाडीच्या डब्ब्याचा दरवाजा तुटून पडल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली़ यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़

Adiband-Purna (Parbhani) Railway Dabba breaks the door | आदिलाबाद-पूूर्णा (परभणी) रेल्वे डब्ब्याचा दरवाजा तुटला

आदिलाबाद-पूूर्णा (परभणी) रेल्वे डब्ब्याचा दरवाजा तुटला

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा: दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या आदिलाबाद-पूर्णा रेल्वे गाडीच्या डब्ब्याचा दरवाजा तुटून पडल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली़ यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़
अदिलाबाद ते पूर्णा ही रेल्वे गाडी नांदेड येथून ११ एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास निघाली होती़ यावेळी गाडीच्या एका डब्ब्याचा दरवाजा निखळून पडलेला आढळून आला़ याच वेळी नांदेड ते पूर्णा दरम्यान वादळी वारे वाहत होते़ काही भागात पाऊसही झाला होता़ वादळी वाऱ्यामुळेच दरवाजा निखळून पडला असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती़ परंतु, प्रत्यक्ष पाहणी केली असता सांध्यातूनच दरवाजा निखळून पडल्याचे दिसून येत होते़ हा दरवाजा केव्हा निखळून पडला याची माहिती मिळू शकली नाही़
रेल्वे सुरू असतांना दरवाजा पडला असता तर प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागला असता अशी चर्चा प्रवाशांमधून ऐकवायास मिळत होती़ नांदेड विभागातील एक्सप्रेस गाड्यांसह पॅसेंजर गाड्यांना जुने व मोडकळीस आलेले डब्बे वापरण्यात येत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे़

Web Title: Adiband-Purna (Parbhani) Railway Dabba breaks the door