गंगाखेडमध्ये माहिती अधिकाराचा दुरुपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:05 IST2021-02-05T06:05:03+5:302021-02-05T06:05:03+5:30
रब्बी हंगामातील कामात शेतकरी व्यस्त खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी व परिसरातील शेतकरी सध्या रब्बी हंगामातील शेती कामात ...

गंगाखेडमध्ये माहिती अधिकाराचा दुरुपयोग
रब्बी हंगामातील कामात शेतकरी व्यस्त
खंडाळी : गंगाखेड तालुक्यातील खंडाळी व परिसरातील शेतकरी सध्या रब्बी हंगामातील शेती कामात व्यस्त दिसून येत आहेत. शेतात गहू, ज्वारी, हरभरा आदी पिके बहरली आहेत. या पिकांमध्ये अंतर मशागतीची कामे शेतकऱ्यांकडून सुरु आहेत. पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकरी या पिकांना पाणी देत असल्याचे पहावयास मिळत आहे.
ऊस रस विक्रीची दुकाने थाटली
गंगाखेड : गंगाखेड शहर व परिसरात आतापासूनच उसाचा रस विक्री करण्याची दुकाने थाटण्यात येऊ लागली आहेत. शिवाय गल्लोगल्ली गाड्यावर रस विक्री करतानाही काही व्यावसायिक दिसून येत आहेत. खरेदीसाठी गर्दी होत आहे.
बोंडअळीमुळे शेतकरी पुन्हा संकटात
देवगाव फाटा: सेलू तालुक्यात कापसावर पुन्हा एकदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातून गेले. याबाबत शासनाकडून मदत मिळाली नाही.
जोडव्यवसायासाठी प्रशिक्षणाची मागणी
देवगाव फाटा : शेतकऱ्यांवर सातत्याने संकटे येत असल्याने काहींकडून शेतीला जोड व्यवसाय म्हणून कुुकुटपालन, दुग्ध व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु, त्यांना या संदर्भातील प्रशिक्षण मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागातील तरुणांना व शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याची मागणी होत आहे.
दुधना नदीचे पात्र झाले अरुंद
देवगाव फाटा : सेलू तालुक्यातील दुधना नदीपात्र परिसरात झाडे, झुडपी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. यामुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. याशिवाय दुधना प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यातही झाडे, झुडपे वाढली आहेत.