परभणी जिल्हा कचेरीवर धडकला भटक्या विमुक्तांचा आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:26 IST2018-07-18T16:24:17+5:302018-07-18T16:26:27+5:30
राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

परभणी जिल्हा कचेरीवर धडकला भटक्या विमुक्तांचा आक्रोश मोर्चा
परभणी : राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सकल भटक्या विमुक्त जाती संघटनेच्या वतीने आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राईनपाडा हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची शासकीय मदत द्यावी, भटक्या विमुक्तांसाठी तिसरी सूची तयार करावी, या प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या. शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १२ वाजेच्या सुमारास या मोर्चाला प्रारंभ झाला. शनिवार बाजार,शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ, विसावा कॉर्नर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.