कडब्याची गंजी लावताना वीज कोसळून महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2023 19:40 IST2023-06-06T19:39:31+5:302023-06-06T19:40:01+5:30

लोणी शिवारातील सुरताबाई तांडा येथील घटना

A woman was killed by lightning while working on ganji of Kadaba | कडब्याची गंजी लावताना वीज कोसळून महिला ठार

कडब्याची गंजी लावताना वीज कोसळून महिला ठार

पाथरी: परसामध्ये कडब्याची गंजी लावत असताना अचानक वीज कोसळून ३९ वर्षीय महिला ठार झाल्याची घटना पाथरी तालुक्यातील सुरताबाई तांडा येथे आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. नीलाबाई रोहिदास जाधव असे मृत महिलेचे नाव आहे. 

पाथरी तालुक्यातील लोणी ग्रामपंचायत अंतर्गत सुरता बाई तांडा येथील नीलाबाई रोहिदास जाधव ( ३८ ) या परिसरामध्ये असणाऱ्या एका कुटूंबाच्या मालकीच्या परसामध्ये घरातील काही सदस्यांसह कडब्याची गंजी लावत होत्या. सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास या भागात अचानक विजांच्या कडकडाटसह पाऊस सुरू झाला. यावेळी वीज कोसळून नीलाबाई गंभीर जखमी झाल्या. उपचारासाठी त्यांना पाथरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

Web Title: A woman was killed by lightning while working on ganji of Kadaba