विद्युत तारेला स्पर्श झाल्याने कडबा गंजी नेणाऱ्या धावत्या टेम्पोला आग
By राजन मगरुळकर | Updated: May 14, 2024 18:44 IST2024-05-14T18:43:58+5:302024-05-14T18:44:22+5:30
परभणी तालुक्यातील मांगणगावची घटना

विद्युत तारेला स्पर्श झाल्याने कडबा गंजी नेणाऱ्या धावत्या टेम्पोला आग
परभणी : तालुक्यातील मांगणगाव परिसरात मंगळवारी दूपारी १ च्या सूमारास मौजे मांगनगाव येथून परभणीकडे कडब्याची गंजी घेऊन येणाऱ्या टेम्पोला रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युत तारेला स्पर्श झाला. यामध्ये स्पार्क होऊन धावत्या टेम्पोला आग लागली.
माहिती मिळताच घटनास्थळी परभणी मनपाचे अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. कडबा गंजी घेऊन जाणाऱ्या वाहनाला लागलेली आग या पथकाने तत्काळ आटोक्यात आणली. घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. मात्र, वाहनाचे व कडब्याचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती वाहन मालक सय्यद मुकदर यांनी मनपा अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर येथे अग्निशमन अधिकारी दिपक कानोडे यांच्यासह पथक दाखल झाले. या ठिकाणी यंत्रणेने तसेच ग्रामस्थांनी मदत केली.