हाताला काम मिळत नसल्याने नैराश्यात शेत मजुराने संपवले जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2022 19:27 IST2022-10-04T19:27:02+5:302022-10-04T19:27:39+5:30
मागील काही दिवसांपासून हाताला काम नसल्याने रामभाऊ तूप समिंद्रे नैराश्यात होते.

हाताला काम मिळत नसल्याने नैराश्यात शेत मजुराने संपवले जीवन
पाथरी (परभणी) : काम मिळत नसल्याने घर खर्च कसा भागवायचा या विवंचनेत पाथरी तालुक्यातील रेणापूर येथील शेत मजुराने घरा समोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ( दि. ३ ) सायंकाळी घडली. रामभाऊ आश्रोबा तुपसमिंद्रे असे मृत मजुराचे नाव आहे.
मागील काही दिवसांपासून हाताला काम नसल्याने रामभाऊ तूप समिंद्रे नैराश्यात होते. यातच आर्थिक विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत सोमवारी सायंकाळी घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोना. वाघ करत आहेत.